महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण
Published on

महावितरणच्या सहाय्यक अभियंत्याला मारहाण
डोंबिवलीत दोघांना अटक
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : डोंबिवली पश्चिमेतील शास्त्रीनगर कैलासनगर भागात वीजपुरवठा खंडित झाला होता. वीजवितरण यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम सुरू असताना तेथील सहाय्यक अभियंत्याला दोघांनी दमदाटी व मारहाण केली. ही घटना बुधवारी (ता. २) मध्यरात्री ही घटना घडली. याप्रकरणी विष्णुनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी मुकेश पाटील, रूपेश (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांना अटक केली आहे.

उच्च दाब वाहिनीतील बिघाडामुळे मंगळवारी रात्री जुन्या डोंबिवलीतील कैलासनगर- शास्त्रीनगर भागाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. जुनी डोंबिवली शाखा कार्यालयाचे सहाय्यक अभियंता जयेश बेंढारी कर्मचाऱ्यांसह दुरुस्तीचे काम करत होते. सहाय्यक अभियंता बेंढारी हे इंदिरानगर भागाचा वीजपुरवठा पूर्ववत करून कैलासनगर चौकात आले. त्यावेळी आरोपी मुकेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेंढारी यांना अडवले, तसेच अपमानजनक भाषा वापरली. बेंढारी यांनी असभ्य भाषेवर आक्षेप घेतल्यानंतर मुकेश पाटील यांच्यासोबत असलेल्या एकाने बेंढारी यांच्या कानाखाली मारली. तसेच, पोलिसांत तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. बेंढारी यांच्या फिर्यादीवरून दोन्ही आरोपींविरुद्ध विष्णुनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक संजय पवार या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com