

अल्पवयीन मुलीचे अपहरण
भिवंडी, ता. ३ (बातमीदार) : काटई गाव येथील एका चाळीत राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अज्ञाताने अपहरण केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात निजामपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची बिहार राज्यातील आहे. ती उदरनिर्वाहासाठी कुटुंबासोबत भिवंडीतील काटई गावातील एका चाळीतील भाड्याच्या खोलीत काही वर्षांपासून राहत आहे. बुधवारी (ता. २) सकाळी घराच्या बाहेरील परिसरात खेळत असताना तिला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून तिचे अपहरण केले आहे. मुलीच्या नातेवाइकांनी बराच वेळ शोध घेऊनही ती सापडली नसल्याने गुरुवारी (ता. ३) निजामपुरा पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस मुलीचा शोध घेत असून पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक ए. टी. पाथरे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.