घनकचरा विभाग स्वच्छता अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस

घनकचरा विभाग स्वच्छता अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
Published on

घनकचरा विभागच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ३ : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील घनकचरा विभागाचे स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांना पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. कल्याण पश्चिमेतील ब प्रभागातील रस्ते, नाले, सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी ही नोटीस बजावली आहे, तसेच ४८ तासांत या नोटीसला उत्तर देण्यास सांगितले आहे. पालिकेच्या इतर प्रभागांतही आयुक्तांनी फेरफटका मारत स्वच्छता अधिकाऱ्यांच्या कामकाजाकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिक करत आहेत.

कल्याण पश्चिमेतील रोझाली सोसायटी परिसरातील उद्यानात स्वच्छतेच्या विषयावर नागरिकांशी संवाद साधण्यासाठी मागील आठवड्यात आयुक्त डाॅ. जाखड गेल्या होत्या. या वेळी उपायुक्त अतुल पाटील, उपायुक्त संजय जाधव उपस्थित होते. उद्यानात आलेल्या झुलेलाल चौक, गोदरेज हिल परिसरातील नागरिकांशी आयुक्तांनी संवाद झाला. नागरिकांनी आपल्या भागात नियमित गटार, रस्ते, चौक सफाई होत नसल्याच्या तक्रारी आयुक्तांकडे केल्या. कचऱ्याविषयी पालिकेच्या ब प्रभागात तक्रारी केल्या, तर त्याचीही दखल घेतली जात नाही. कचरा एकाच जागी अनेक दिवस साठून राहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असल्याच्या तक्रारी आयुक्त डाॅ. जाखड यांच्याकडे नागरिकांनी केल्या.

ब प्रभागातील स्वच्छतेची जबाबदारी स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर यांची आहे. ते आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत नसल्याने ब प्रभागात गुणवत्तापूर्ण स्वच्छता होत नसल्याचा निष्कर्ष काढत आयुक्तांनी स्वच्छता अधिकारी मांजरेकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावली. येत्या ४८ तासांच्या आत या नोटिसीला मांजरेकर यांनी उत्तर दिले नाही, तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त नियमाने कारवाई करण्याची तंबी आयुक्तांनी दिली आहे.

तक्रारीची गंभीर दखल
कल्याण-डोंबिवली शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिका प्रशासनाने विविध स्तरावर उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमांतर्गत पालिका आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड उद्याने, बगीचे, सार्वजनिक ठिकाणी सकाळच्या वेळेत फिरण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांशी थेट संवाद साधून आपल्या प्रभागात स्वच्छता होते की नाही. पालिका स्वच्छता अधिकारी, कामगार आपल्या प्रभागात वेळेवर येतात की नाही. आपल्या प्रभागातील कचरा नियमित उचलला जातो की नाही याविषयीची माहिती घेत आहेत. या वेळी नागरिकांकडून होणाऱ्या तक्रारीची गंभीर दखल आयुक्त डाॅ. जाखड घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com