महिला मंडळाचा शारदोत्सव

महिला मंडळाचा शारदोत्सव
Published on

महिला मंडळाचा शारदोत्सव
मुलुंड, ता. ३ (बातमीदार) ः मुलुंडमधील सर्व महिला मंडळांतर्फे ‘शारदोत्सव २०२४’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ५९वे वर्ष आहे. यानिमित्त ‘मुक्ताबाई ते बहिणाबाई’ अशा महाराष्ट्राच्या देदीप्यमान संत पंचकन्यांच्या तेजोमय जीवनाचा आढावा घेणारा ‘तिनेच गगन झेलियेले’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याचे सादरीकरण डॉ. अपर्णा बेडेकर करणार आहेत. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. ४) दुपारी तीन वाजता सेवा संघाच्या सु. ल. गद्रे सभागृहात होणार आहे. कल्पना विहार, राष्ट्रसेविका समिती, चित्‍पावन संघ महिला विभाग, कऱ्हाडे ब्राह्मण संघ, मराठा मंडळ महिला विभाग, देशस्थ ऋग्वेदी महिला मंडळ, रुद्राणी पुरोहिता मंडळ, मैत्रेयी विभाग महाराष्ट्र सेवा संघ यांच्या सहयोगाने हा शारदोस्तव होणार असून त्याला प्रवेश विनामूल्य आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com