विद्यार्थ्यांनी घेतले संसदीय कामकाजाचे धडे

विद्यार्थ्यांनी घेतले संसदीय कामकाजाचे धडे
Published on

विद्यार्थ्यांनी घेतले संसदीय कामकाजाचे धडे
धारावी, ता. ३ (बातमीदार) : विद्यार्थ्यांना संसदीय कार्यप्रणाली कशी चालते, हे समजावण्याच्या दृष्टीने गुरू नानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग, संविधान क्लब, मतदार साक्षरता क्लब मुंबई विद्यापीठ स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स ॲण्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज यांच्या संयुक्त विद्यमाने विधानभवन अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. या अभ्यास दौऱ्यात वि. स. पागे प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अधिकारी नीलेश मदाने यांनी विधिमंडळाच्या सभागृहांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर प्रकाश टाकला व दोन्ही सभागृहाचे कामकाज कसे चालते समजावून सांगितले.
महाराष्ट्र विधिमंडळाला १०० वर्षे पूर्ण झाल्‍याबाबतचा गौरवशाली इतिहास विद्यार्थांना समजावून सांगताना सभागृहात घेण्यात आलेल्या ऐतिहासिक निर्णयांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांनी विधानसभा, विधान परिषद दालन आणि सेंट्रल हॉल येथे भेट दिली. आपले मनोगत मांडताना विद्यार्थी भारावून गेले होते. नीलेश मदाने यांनी प्रा. सुमित खरात, प्रा. भूषण ठाकरे यांना राष्ट्रपतींनी प्रकाशित केलेल्‍या ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ हे पुस्तक भेट दिले. प्रा. सुमित खरात यांनी वि. स. पागे प्रशिक्षण केंद्रप्रमुख नीलेश मदाने, महाराष्ट्र विधिमंडळ सचिवालयाचे केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com