केडीएमसीसमोर रहिवाशांचा ठिय्या

केडीएमसीसमोर रहिवाशांचा ठिय्या
Published on

कल्याण, ता. ३ (वार्ताहर) : कल्याण पूर्वेतील तिसगाव नाका येथील सहजीवन रेसिडेन्सी सोसायटीमधील प्रलंबित मागण्यांमुळे त्रस्त आहे. याप्रकरणी विकसक, पालिका पोलिस प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत; पण त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अखेर पालिका मुख्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
‘सहजीवन रेसिडेन्सी’मध्ये दीड हजारांहून अधिक रहिवासी राहत आहेत. गेली अनेक वर्षे येथील रहिवासी कंपाऊंड वॉल आणि सोसायटीसंबंधित अनेक प्रश्नांसाठी, विकसकाकडे पाठपुरावा करत आहेत. महापालिका यंत्रणा आणि पोलिसांकडे दाद मागण्यासाठी अनेक तक्रारी, कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने मांडल्या; मात्र विकसक, महापालिका, पोलिस यंत्रणा रहिवाशांना न्याय देऊ शकले नाहीत. त्यामुळे बिल्डरने अपूर्ण ठेवलेली, दक्षिण बाजूकडील अर्धवट अधिकृत वाडेभिंत, त्वरित बांधून बंदिस्त करणे, या मागणीसाठी केडीएमसी मुख्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com