

भाईंदर, ता. ३ (बातमीदार) : नकली पिस्तुलाची भीती दाखवत दहा लाखांची लूट करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ३६ तासांत अटक केली आहे. काशीमिरा भागात दोन दिवसांपूर्वी ही घटना घडली होती. यातील तीनही आरोपी फिर्यादीचे नातेवाईक असल्याचे उघड झाले आहे.
काशी गावातील मोहम्मद अहमद यांच्या घरी शुक्रवारी (ता. ३०) पहाटे साडेचारच्या सुमारास बुरखा घातलेल्या तिघांना नकली पिस्तुलाचा धाक दाखवत दूध व्यवसायाची दहा लाखांची रक्कम लुटली होती. आरोपींमध्ये एका महिलेचाही समावेश होता. या प्रकरणात घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर आरोपींनी रिक्षा, कारचा वापर केल्याचे दिसून आले होते. कारच्या मालकाचा शोध घेतल्यानंतर पोलिसांनी नालासोपारा येथे राहणाऱ्या जुबेर शेख, कामरान शेखसह महिला आरोपीला अटक केली. त्यांच्याकडून दहा लाखांची रोकडसह नकली पिस्तूल पोलिसांनी जप्त केले आहे.
-----------------------------------
कामरान यापूर्वी मोहम्मद यांच्यासोबत दूध व्यवसायात काम करत होता. त्यामुळे घरात रोकड ठेवण्याची जागा त्याला माहीत होती; पण कर्जबाजारीपणामुळे त्याने हा कट रचला. न्यायालयाने आरोपींना ४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
-प्रकाश गायकवाड, पोलिस उपायुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.