कळंबोली जंक्शनसाठी ७७० कोटींचा निधी

कळंबोली जंक्शनसाठी ७७० कोटींचा निधी
Published on

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ३ ः कळंबोली जंक्शनच्या विकासासाठी ७७०.४९ कोटींचा निधी मंजूर केल्याची माहिती आज केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरील राष्ट्रीय महामार्ग-४८ आणि राष्ट्रीय महामार्ग-५४८ तसेच सायन-पनवेल महामार्गावरील कळंबोली जंक्शन हा १५.५३ किमी अंतराचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. कळंबोली जंक्शन अद्ययावत केल्याने या प्रमुख महामार्गावरून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे सहजपणे जाणे शक्य होणार आहे. तसेच, रस्त्यावरील वाहनांची संख्या दोन लाखांनी वाढणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com