

नवी मुंबई, ता. ४ (वार्ताहर): नवी मुंबई पोलिस दलाच्या नावाने बनावट एक्स हँडल तयार करून त्यावर अश्लील फोटो टाकण्यात आले आहेत. याप्रकरणी नवी मुंबई सायबर पोलिसांनी बनावटगिरीसह आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.
नवी मुंबई पोलिसांनी सायबर, आर्थिक, अमली पदार्थविरोधी गुन्हे, तसेच महिला सुरक्षेसंदर्भात जनजागृतीसाठी समाजमाध्यमांचा वापर सुरू केला आहे, पण हायटेक अशी ओळख असलेल्या नवी मुंबई पोलिसांनाच सायबर गुन्हेगाराने बनावट एक्स (ट्वीटर) हँडलवर अश्लील फोटो पोस्ट करत बदनाम केले आहे, तसेच पोलिसांचे बनावट इन्स्टाग्राम अकाऊंटसुद्धा तयार करण्यात आलेले आहे. महत्त्वाचे म्हणजे, २०२० पासून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे पोलिस दलाच्या नावाचा, तसेच महाराष्ट्र पोलिस दलाच्या चिन्हाचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.