ठाण्यात प्रेमप्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या
ठाण्यात प्रेम प्रकरणातून तरुणाची निर्घृण हत्या
कोयता, कटरने ५० वार
ठाणे शहर, ता. ४ (बातमीदार)ः कोपरीतील संचार इमारतीमध्ये प्रेम प्रकरणातून विकसकाच्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. शुक्रवारी (ता. ४) सकाळी सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. हत्या झालेल्या तरुणाचे नाव स्वयम शैलेश परांजपे असे असून या गुन्ह्यात त्याच्या प्रेयसीने आरोपीला मदत केल्याची गंभीर बाबदेखील प्राथमिक चौकशीत समोर आली असून दोघांनाही कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्वयम (वय ३३) हा त्याच्या प्रेयसीला ब्लॅकमेल करत होता. तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करायची धमकी देत होता. त्यामुळे शुक्रवारी सकाळी तिने आणि तिचा नवा प्रियकर मयुरेश नंदू धुमाळ (वय २४) याने स्वयमच्या घरी जाऊन त्याच्यावर कोयत्याने आणि कटरच्या सहाय्याने हल्ला केला. त्याच्यावर ५० वार झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. स्वयमचे वडील शैलेश परांजपे हे विकसक असल्याचे समजते. आश्चर्याची बाब अशी की, हत्या करून झाल्यावर युवती आणि तिचा प्रियकर इमारतीच्या खाली सुमारे १० मिनिटे बाकड्यावर शांतपणे बसून होते. मयुरेश प्रेयसीसोबत इमारतीच्या खाली बाकड्यावर बसून सिगारेटचे झुरके घेत पोलिस येण्याची वाट पाहत होता. आरोपीचे वडील पोलिस सेवेत होते, असे सूत्रांनी सांगितले. पोलिस आल्यावर गाडीत बसून त्यांनी स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात नेला होता. तेथून तो फॉरेन्सिक तपासणीसाठी जे. जे. रुग्णालयात पाठवून दिला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी सांगितले. सहायक पोलिस आयुक्त हेमंत शिंदे यांनी सांगितले की, दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून धुमाळ हा जांभळी नाका आणि त्याची प्रेयसी चेंदणी कोळीवाडा येथे राहत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.
...
गुरुवारी रात्री शोधाशोध
युवतीने तिच्यासोबत घडलेला प्रकार मयुरेश धुमाळ याला सांगताच स्वयम याला कायमचा संपविण्याचा निर्धार करून युवती आणि मयुरेश त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न गुरुवारी रात्री करीत होते; मात्र तो सापडला नाही. शुक्रवारी सकाळीच मयुरेश कोयत्यासह स्वयमच्या राहत्या घरी अष्टविनायक चौक कोपरी येथे पोहोचला. घरी स्वयम एकटाच होता. मयुरेश आणि स्वयम यांच्यात वादावादी झाली. नग्न फोटो डिलीट करण्यास नकार देणाऱ्या स्वयम याच्यावर मयूरने कोयत्याने वार करून त्याची हत्या केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

