ट्रकच्या चाकाखाली क्लिनरचा मृत्यू

ट्रकच्या चाकाखाली क्लिनरचा मृत्यू

Published on

नवी मुंबई (वार्ताहर) : ट्रकच्या चाकाखाली आल्याने क्लिनरचा मृत्यू झाला आहे. एपीएमसीतील कांदा- बटाटा मार्केटमध्ये गुरुवारी सायंकाळी ही घटना घडली. आग्रा येथून बटाट्याने भरलेल्या ट्रकसोबत उत्तर प्रदेशातील सत्येंद्रकुमार कुशवाह (३०) हा एपीएमसीतील कांदा- बटाटा मार्केटमध्ये आला होता. सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ट्रकचालक लक्ष्मणसिंह रूपसिंह याने कोणी नसल्याच्या खात्रीशिवायच ट्रक मागे घेतला. यात ट्रकच्या पाठीमागे उभा असलेला क्लिनर सत्येंद्रकुमार हा चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com