अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन मागे

अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन मागे

Published on

अंगणवाडी सेविकांचे धरणे आंदोलन मागे
मंत्रिमंडळात मानधनवाढीचा निर्णय; येत्या दोन दिवसांत ‘जीआर’

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी अखेर १२ दिवसांनी आझाद मैदानावरील धरणे आंदोलन मागे घेतले आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीकडून मिळालेल्या माहितीनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीचा निर्णय मंत्रिमंडळात मंजूर झाला असून येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील परिपत्रक काढले जाणार आहे.

ग्रॅच्युइटीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करणे बंधनकारक असून पेन्शनबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असल्याचे कृती समितीने या वेळी सांगितले. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृतीची शुक्रवारी (ता. ४) महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव अनुप कुमार व अन्य अधिकाऱ्यांच्या सोबत याबाबत बैठक झाली. या वेळी मंत्रिमंडळात मानधनवाढीचा निर्णय घेण्यात आला असून पुढील दोन दिवसांत याबाबत परिपत्रक काढण्यात येईल, अशी माहिती मंत्र्यांनी दिली, तसेच ग्रॅच्युइटी व पेन्शनचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाला असून सरकारने सकारात्मक भूमिका घेतल्याचेही या वेळी सांगण्यात आले. या कृती समितीच्या शिष्टमंडळात एम. ए. पाटील, शुभा शमीम, दिलीप उटाणे, नितीन पवार, दत्ता देशमुख, सुवर्णा तळेकर व राजेश सिंग यांचा समावेश होता.

..
आंदोलनकर्त्यांचा जल्लोष
मानधनवाढीचा निर्णय मंत्रिमंडळात झाल्याचे आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना कृती समितीच्या नेत्यांनी सांगितल्यावर आंदोलनकर्त्यांनी त्यांनी एकच जल्लोष केला. सर्वांशी चर्चा करून २३ सप्टेंबरपासून सुरू असलेले बेमुदत धरणे आंदोलन शुक्रवारी स्थगित करत असल्याचे जाहीर करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com