व्याजदर कपात सध्या नाही अर्थतज्ज्ञांचा अंदाज

व्याजदर कपात सध्या नाही अर्थतज्ज्ञांचा अंदाज
Published on

व्याजदर कपात सध्या नाही
अर्थतज्ज्ञांचा अंदाज
मुंबई, ता. ४ : रिझर्व बँकेतर्फे पतधोरण समितीच्या येत्या बैठकीत व्याजदर कपात केली जाणार नाही. डिसेंबरपासून व्याजदर कपातीचे सत्र सुरू होईल, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
भारताच्या जीडीपीवाढीचा अंदाज घटवण्यात आला असला आणि कंपनी उत्पादन निर्देशांकही घसरला असला तरी पुढील आठवड्यातील बैठकीत रिझर्व बँक व्याजदर कपात करणार नाही. डिसेंबरला खरीप पीक उत्पादनाचा पूर्ण अंदाज येईल, तसेच जीडीपीवाढीचा अंदाजही स्पष्ट होईल. त्यामुळे आताच हे अंदाज अस्पष्ट असताना दरकपात होणार नाही, अशी शक्यता कोटक महिंद्र ए.एम.सी.चे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर दीपक अग्रवाल यांनी वर्तवली. तर या बैठकीत व्याजदर कपातीचा निर्णय होणार नाही, असे मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्विसेसचे सिद्धार्थ खेमका यांनी आज सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com