

हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण
मुंबई महापालिकेचे नोंदणी करण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ४ : महापालिका क्षेत्रातील मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण २०१३ मध्ये करण्यात आले होते. त्या वेळी एकाही कामगाराची नोंद झाली नव्हती. आता एका याचिकेच्या निमित्ताने केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या निर्देशानुसार पालिका क्षेत्रातील डोक्यावर मैला वाहून नेणारे कामगारांचे सर्वेक्षण ६ ऑक्टोबर २०२४ ते १६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत करण्यात येणार आहे.
केंद्र शासनाने हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या नियुक्तीस प्रतिबंध करणे व त्यांचे पुनर्वसन करणे अधिनियम २०१३ पारित केला आहे. या कायद्याची अंमलबजावणी ६ डिसेंबर २०१३ पासून करण्यात आलेली आहे. त्यानुसार करण्यात आलेल्या २०१३च्या सर्वेक्षणामध्ये पालिका क्षेत्रात हाताने मैला उचलणाऱ्या एकाही सफाई कामगारांची नोंद झाली नव्हती. हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या विषयाच्या निमित्ताने नुकतीच रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभागाचे सचिव यांनी सर्व महापालिका, नगरपालिका, नगर परिषदा यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांचे सर्वेक्षण करण्याबाबत सूचित केले आहे. या निर्देशानुसार मुंबई पालिका क्षेत्रात या सर्वेक्षणाला सुरुवात होणार आहे.
..
त्रयस्थ संस्थेची नेमणूक
हाताने मैला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या सर्वेक्षणासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत एका त्रयस्थ संस्थेची नेमणूक करण्यात येणार आहे, तसेच पथनाट्याच्या माध्यमातूनही या कामगारांच्या विषयाची जनजागृती करण्यात येणार आहे, तसेच सर्वेक्षणअंतर्गत नाव नोंदविण्यासाठीची जाहीर सूचना प्रत्येक विभागातील शौचालय, सेक्शन चौकी, मोटर लोडर चौकी आदी ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.