रेडिओ फ्रिक्वेन्सी यंत्रांची चोरी
भाईंदर, ता. ४ (बातमीदार): मोबाईल टॉवरवर रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठी लावलेल्या यंत्रांची चोरी करून आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री प्रकरणात आंतरराज्य टोळीला पकडण्यात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-३ ला यश आले. या प्रकरणात ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
नालासोपारा येथील एका इमारतीवरील मोबाईल टॉवरवर ५ जी नेटवर्कसाठी बसवलेले रेडिओ फ्रिक्वेन्सीसाठीचे आरआर युनिट यंत्र चोरल्याची तक्रार आचोळे पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अशा प्रकारच्या गुन्ह्यात वाढ झाल्याने तपास गुन्हे शाखा कक्ष-३ कडे वर्ग करण्यात आला. या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून शुभम यादव, शैलेश यादव, कपुरचंद्र गुप्ता, बन्सीलाल जैन, जाकीर मल्लीक, जैद मलीक, मोहम्मद मलिक यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३६ रेडिओ फ्रिक्वेन्सी यंत्र, मोबाईल फोन, तसेच गुन्ह्यासाठी वापरलेली मोटरसायकल असा ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
--------------------------------------
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार-नालासोपारा, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, पंजाब, गोवा येथे वर्षभरापासून आरोपींनी मोठ्या प्रमाणात यंत्रांची चोरी करून हाँगकाँग, चीन येथे बेकायदेशीररीत्या विकल्याचे तपासात उघड झाले आहे. या यंत्रांची पुन्हा जास्त किमतीत विक्रीचा संशय आहे.
- मधुकर पांडे, पोलिस आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

