कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्र मंजूर करा

कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्र मंजूर करा

Published on

कृषी महाविद्यालय व संशोधन केंद्र मंजूर करा
बबन हरणे यांचे राज्यपालांना साकडे
खर्डी, ता. ५ (बातमीदार) : ठाणे जिल्ह्यातील भातक्षेत्र ७० हजार हेक्टर आहे. तर दीड लाख शेतकरी खातेदार आहेत. शहापूर-मुरबाड तालुक्यातील काकडी, भेंडी परदेशात निर्यात होते; मात्र येथे कृषी विज्ञान केंद्र जवळ नाही, संशोधक नसल्याने शेतकऱ्यांना मार्गदर्शनविषयक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यावर मात करण्यासाठी शहापूर तालुक्यात कृषी महाविद्यालय व कृषी संशोधन केंद्र मंजूर करा, अशी मागणी शहापूर तालुक्यातील चेरपोली येथील उद्यानपंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी बबन हरणे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ठाणे जिल्ह्यातील शहापूर हा एकमेव पेसा क्षेत्रातील आदिवासीबहुल तालुका आहे. संपूर्णतः ग्रीन झोन असलेल्या या तालुक्यात तानसा, भातसा, वैतरणा या धरणांसोबत लघुपाटबंधारे विभागाचे सात लहान बंधारे, शाई, वैतरणा, भातसा या बारमाही नद्यांमुळे मोठ्या प्रमाणात भातशेती, भाजीपाला लागवड, कडधान्ये व फळबागा लागवडी आहेत. त्याचा फायदा शहापूर- मुरबाड या शेतीबहुल क्षेत्रासह संपूर्ण ठाणे जिल्हा व शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होईल. तसेच, आधुनिक पद्धतीने शेती करणे, यासह नवीन पिढीला कृषीविषयक शिक्षण व प्रशिक्षण मिळाल्यास गोरगरिबांची मुलेही कृषी पदवीधर होतील, असे हरणे यांनी निवेदनात म्हटले आहे.

चांग्याचापाडा गावचे सुपुत्र, प्रयोगशील शेतकरी बबन हरणे व त्यांची पत्नी सविता हरणे यांना महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांचे हस्ते राज्यस्तरीय उद्यान पंडित पुरस्कार देण्यात आला. बक्षीस स्वरूपात मिळालेली एक लाख रुपयांची रक्कम कुणबी समाजोन्नती संघासाठी हरणे यांनी पदाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री धनंजय मुंडे, सिनेअभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

फोटो ः मुंबई येथे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना सविता व बबन हरणे यांच्यासहित उपस्थित मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com