मुले चोरणारी टोळी जेरबंद
कासा, ता.५ (बातमीदार)ः कासा पोलिस ठाणे हद्दीत चारोटी नाका येथील उड्डाणपुलाखाली मुले चोरणाऱ्या टोळीला कासा पोलिसांनी पकडले आहे. या प्रकरणात सहा जणांना ताब्यात घेतले असून दोन मुलांची सुटका करण्यात आली आहे.
चारोटी उड्डाणपुलाखाली काही पुरुष आणि महिलांमध्ये आपआपसांत वादविवाद सुरू असल्याची माहिती चिराग मेहेर यांनी पोलिसांना दिली होती. त्यानुसार कासा पोलिसांच्या पथकाने भांडण करणाऱ्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांना घाबरलेल्या अवस्थेतील दोन मुलेही दिसून आली. त्यांना विश्वासात घेतल्यानंतर कल्याण येथून चोरून आणल्याची माहिती समोर आली होती. मुलांनी दिलेली माहिती खरी असल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी विनोद गोसावी (वय २९), आकाश गोसावी (वय२८), अंजली गोसावी (वय२८), चंदा गोसावी (वय ५५), जयश्री गोसावी (वय २५), राहुल गोसावी (वय २७ ) सर्व रा.मेशाळ, विजयनगर, ता. मिरज, जि.सांगली यांना अटक केली आहे. तर सूरज मिश्रा (वय ८), सत्यम मिश्राला (वय ५) पालकांच्या ताब्यात दिले आहे. दोन दिवसांपूर्वी कल्याण येथून या मुलांना पळवून आणण्यात आले होते.
-------------------------------------------------------
दोन्ही मुलांचा पालकांकडे ताबा
कासा पोलिसांनी कल्याण येथील महात्मा फुले पोलिस ठाण्याशी संपर्क साधल्यानंतर दोन मुले हरवल्याची नोंद होती. त्यानंतर कल्याण पोलिसांचे पथक रात्री उशिरा कासा येथे दाखल झाले. यावेळी मुलांचे वडील अखिलेश मिश्रा देखील आले होते. त्यांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतले. तसेच आपापसांत मारामारी केल्यामुळे किरकोळ स्वरूपात जखमी असलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
-------------------------------------------------------
लहान मुले प्रलोभनाला बळी पडू शकतात. त्यामुळे पालकांनी काळजी घ्यावी. तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.
-अविनाश मांदळे, अधिकारी, कासा पोलिस ठाणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

