म्हाडा सोडतीसाठी 
एक लाख अर्ज वैध

म्हाडा सोडतीसाठी एक लाख अर्ज वैध

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,०३० घरांच्या विक्रीसाठी सोडत काढली जाणार आहे. त्यासाठी आलेल्या एकूण अर्जांपैकी २६९ अर्ज वेगवगेळ्या कारणाने बाद ठरले आहेत. त्यामुळे आता एक लाख १३ हजार ५४२ अर्ज वैध ठरले आहेत. त्या माध्यमातून ८ ऑक्टोबरला ही सोडत काढली जाणार आहे.
मुंबईत म्हाडाचे घर मिळावे म्हणून अर्ज करण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत म्हाडाकडे अनामत रकमेसह तब्बल एक लाख १३ हजार ८११ अर्ज आले आहेत. म्हाडाने केलेल्या तपासणीत जवळपास ५७६ अर्जांत त्रुटी आढळल्या आहेत. त्यावर म्हाडाने संबंधितांकडून हरकती किंवा त्यांची बाजू मांडण्याकरिता तीन दिवसांची मुदत दिली होती. त्यानुसार ५७६ पैकी ३११ अर्जदारांनी हरकती घेतल्या आहेत. त्यावर अंतिम निर्णय झाला असून जवळपास २६९ अर्ज उत्पन्न गटातील त्रुटी, डोमिसाइल नसणे, जातीचा दाखला, आधार कार्ड मॅच न होणे इत्यादी कारणांनी बाद करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com