कोकण मंडळात आठ हजार घरे

कोकण मंडळात आठ हजार घरे

Published on

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ५ : म्हाडाच्या मुंबई मंडळानंतर आता कोकण मंडळही आठ हजारहून अधिक घरांची सोडत काढण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी म्हाडाकडून आचासंहितेआधी त्याची जाहिरात काढली जाण्याची शक्यता आहे. ठाणे, शिरढोण, खोणी, भंडार्ली, गोठेघर येथील घरांचा या सोडतीत समावेश असणार आहे. त्यामुळे म्हाडाचे घर घेण्यास इच्छुक असलेल्यांना आपले गृहस्वप्न साकार करण्याची संधी मिळणार आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई मंडळाने २,०३० घरांच्या सोडतीला मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या घरांसाठी एक लाखाहून अधिक अर्ज आले आहेत. त्यामुळे कोकण मंडळाने आता ठाणे, पालघर जिल्ह्यांत असलेल्या घरांसाठी सोडत काढण्याची तयारी सुरू केली. त्यानुसार घरांच्या किमती अंतिम केल्या असून म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. ती मिळताच तत्काळ जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याचे म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
----
आवास योजनेंतर्गत ६,७०० घरे
म्हाडाकडून काढल्या जाणाऱ्या आठ हजार घरांमध्ये पंतप्रधान आवास योजनेतील सहा हजार ७००, तर खासगी विकसकांकडून मिळालेल्या ६००, एकात्मिक गृहनिर्माण योजनेतील ३०० घरांचा समावेश असणार आहेत. विरार-बोळिंज येथील घरांचीही प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com