कल्याण-डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे जखमी
दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघे जखमी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : कल्याण आणि डोंबिवलीत दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दुचाकीने दिलेल्या धडकेत दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. यात एक शाळकरी विद्यार्थिनी आणि एका दुचाकीस्वाराचा समावेश आहे.
पहिल्या घटनेत गार्गी मोहन सूर्यवंशी (वय १६) ही कल्याण पश्चिमेतील वाडेघर भागात राहणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळा सुटल्यानंतर रस्ता ओलांडताना अपघात झाला. शिवाजी महाराज चौकाजवळ एका भरधाव मोटारीने तिला धडक दिली. ज्यात तिच्या डाव्या पायावरून मोटारीचे चाक गेले. मोटारचालक अपघातस्थळावरून पळून गेला. याप्रकरणी गार्गीच्या पालकांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दुसऱ्या घटनेत, निळजे येथील अनिकेत देशमुख (वय ३६) हे दुचाकीवरून शिळफाटा रस्त्याने जात होते. यावेळी एक्सपेरिया मॉलजवळ एका मोटारीने त्यांना धडक दिली. त्यांच्या उजव्या पायाला गंभीर इजा झाली आहे. त्यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून कल्याण-डोंबिवलीत वेगाने वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. नागरिक अशा चालकांवर कठोर कारवाईची मागणी करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

