भिवंडीत जिल्हास्तरीय शालेय बुद्धीबळ स्पर्धा
भिवंडीत जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धा
महानगरपालिका आयुक्त यांच्या हस्ते उदघाटन
भिवंडी, ता. ९ (बातमीदार) : शालेय क्रीडा स्पर्धा भिवंडीत होत आहेत. भिवंडी निजामपूर शहर महापालिका, तसेच क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद ठाणे यांच्या सहयोगाने स्पर्धा आयोजित केल्या आहेत. यामध्ये १४, १७, १९ या वयोगटातील मुला-मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय बुद्धिबळ क्रीडा स्पर्धेचे आयोजन केले. मंगळवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता स्व. राजय्या गांजेगी सभागृहात या स्पर्धेचे उद्घाटन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले.
उद्घाटनप्रसंगी पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी म्हटले की, विविध खेळाला पोषक असे वातावरण तयार झाले, तर त्यातून चांगले खेळाडू तयार होतील. कोणताही क्रीडाप्रकार खेळताना आपल्या शरीर व मनाचा व्यायाम होत असतो. पालिकेच्या वतीने अशा विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांच्या आयोजन करण्यात येणार आहे. खेळाच्या माध्यमातून खेळाडूचा सर्वागीण विकास होत असतो. भिवंडी पालिकेला २०१०-२०११ पासून क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी जिल्ह्याचा दर्जा प्राप्त झाल्याने या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंना थेट विभागीय स्पर्धेत खेळण्यासाठी संधी मिळणार आहे.
भिवंडी शहराचे नाव देश पातळीवर लौकिक वाढवणारे खेळाडू घडतील, तसेच भिवंडी शहर प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहे. अनेक गुणवंत क्रीडापटू भिवंडी शहरात निर्माण व्हावेत, यासाठी खेळाडूंनी आपले क्रीडागुण सिद्ध करण्यासाठी या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धा एक चांगले माध्यम आहे. याद्वारे अनेक गुणवंत खेळाडू नावारूपाला येतील, अशी आशा पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी व्यक्त केली.
या वेळी पालिका अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके, क्रीडा विभागाच्या उपायुक्त प्रणाली घोंगे, क्रीडा विभागप्रमुख तथा सहाय्यक आयुक्त, जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले, प्रभाग समिती दोनचे सहायक आयुक्त माणिक जाधव, अग्निशमन विभागप्रमुख राजेश पवार, क्रीडा अधिकारी शरद कलावंत, जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव राकेश जोशी व अन्य क्रीडा समिती सदस्य उपस्थित होते.
सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र
बुद्धिबळ स्पर्धेत पालिका कार्यक्षेत्रातील ५० शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला. ५५० हून अधिक गुणवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून विविध ४९ क्रीडाप्रकारात आपल्या क्रीडागुणांचे प्रदर्शन घडविणार आहेत. प्रत्येक वयोगटातील गुणानुक्रमे पहिले ५ खेळाडू विभागीय स्पर्धेत भिवंडी महापालिकेचे प्रतिनिधित्व करणार आहेत. प्रत्येक खेळाडूंना महापालिकेतर्फे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

