तायक्‍वाँडो सबर्बन मुंबई संघटनेची निवडणूक जाहीर

तायक्‍वाँडो सबर्बन मुंबई संघटनेची निवडणूक जाहीर

Published on

तायक्वाँदो सबर्बन मुंबई संघटनेची निवडणूक जाहीर
घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः तायक्वाँदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबई जिल्हा संघटनेची चौवार्षिक निवडणूक रविवारी (ता. १३) सायंकाळी पाच वाजता स्टार फिटनेस अकॅडमी, कांजूरमार्ग पोलिस ठाण्याच्या बाजूला, कांजूरमार्ग पूर्व येथे घेण्यात येणार आहे. संघटनेचे अध्यक्ष विनायक गायकवाड यांच्या निधनानंतर तायक्वाँदो असोसिएशन ऑफ सबर्बन मुंबई या संघटनेवर तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र, मुंबईतर्फे ॲड हॉक कमिटी काम पाहत होती. ॲड हॉक कमिटीतर्फे २१ सप्टेंबर २०२४ रोजी कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी येथे विशेष सर्वसाधारण सभा घेण्यात आली होती. या सभेत निवडणूक प्रक्रिया कुठे, कधी घ्यायची हे ठरले. तसेच, निवडणूक अधिकारी म्हणून धन्यकुमार तळणकर यांची निवड करण्यात आली. तसेच, या सभेसाठी एकूण १४ अकॅडमी हजर होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com