सरळगांव परिसराला चक्रीवादळाचा फटका

सरळगांव परिसराला चक्रीवादळाचा फटका

Published on

सरळगाव परिसराला चक्रीवादळाचा फटका
सरळगाव, ता. ९ (बातमीदार) : चक्रीवादळाचा फटका बसल्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे. तसेच, रात्रभर विद्युत पुरवठा खंडित झाल्याने उकाड्याने नागरिकांची झोप उडाली. मंगळवारी (ता. ८) रात्री सात वाजेपर्यंत पावसाची शक्यता नसताना रात्री नऊनंतर गडगडाटासह पावसाने सुरुवात केली. वादळी वाऱ्यामुळे अनेकांनी दरवाजे-खिडक्या बंद करून घरात बसणे पसंत केले. वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे उमळून पडली. अनेक झाडे विद्युत वाहिनीवर पडल्याने पुरवठा खंडित झाला होता. तर, झाडे पडून अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे; मात्र जीवितहानी कुठेही झाली नसल्याची माहिती तहसीलदार अभिजित देशमुख यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com