भंगार विक्रेत्यांकडून महिलांचा विनयभंग
भंगार विक्रेत्यांकडून महिलांचा विनयभंग
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ९ : सांगावमधील चेरानगर भागात भंगारविक्रीचा व्यवसाय करणारे विक्रेते त्या भागातील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांची छेडछाड करत होते. तसेच, महिला दिसताच अश्लील शेरेबाजी करून महिलांच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल, अशी वर्तणूक करत होते. भंगार विक्रेत्यांचे हे वागणे दिवसेंदिवस वाढू लागल्याने अखेर एका महिलेने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करत रूस्तम खान (वय ४०), इस्तिखार खान (वय २१), अब्दुल खान (वय २८) यांना अटक केली आहे. तर, अश्रफ खान (वय २८) हा पळून गेला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
डोंबिवली पूर्वेतील सागाव भागातील चेरानगरमधील रविकिरण सोसायटीतील एका गाळ्यात भंगार खरेदी- विक्रीचा व्यवसाय हे चौघे करतात. या भंगारविक्री दुकानासमोरील रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या महिलांची ते छेड काढत असत. महिलांकडे पाहून शेरेबाजी करून या महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत होते. मागील अनेक दिवसांपासून या विक्रेत्यांविषयी महिलांच्या तक्रारी वाढल्या होत्या. काही महिलांनी आपल्या घरी हा प्रकार सांगितला होता. हे प्रकार वाढू लागल्याने त्रस्त महिलांनी एकत्र येऊन या भंगार विक्रेत्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात तक्रार करण्याचा निर्णय घेतला. एका महिलेच्या तक्रारीवरून या भंगार विक्रेत्यांवर मानपाडा पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

