घरफोडींच्या गुन्ह्यातील दोन संशयितांना अटक
पालघर, ता. ९ (बातमीदार) : शहरात घरफोडीच्या, चोरीच्या घटना वाढल्या असतानाच दोन घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा पालघर पोलिसांनी केला आहे. याप्रकरणी दोन चोरट्यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. एका चोरट्याने तब्बल १७ घरफोडींचे गुन्हे केल्याची कबुली दिली असून त्याच्याकडून चोरी झालेला काही ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.
पालघर शहरातील साई रेसिडेन्सीजवळील महावीर निधी या इमारतीमधील रहिवासी शोएब अकबर शेख बाहेर गेले होते. त्यांच्या सदनिकेचे बंद दरवाजे चोरट्याने तोडून आत प्रवेश करून कपाटामध्ये ठेवलेले २१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. याप्रकरणी त्यांनी पालघर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तांत्रिक स्वरूपाच्या मदतीने शफिक अब्दुल शेख उर्फ टोपी (वय ४६, रा. भिवंडी) याला जूचंद्र येथून ताब्यात घेतले. त्याने यापूर्वी रबाळे (नवी मुंबई), कासारवडवली, दमण पोलिस ठाणे परिसरातील विविध ठिकाणी एकूण १७ घरफोडी केल्याची कबुली दिली. घरफोडीचा दुसरा गुन्हा नाना नानी पार्क येथील माधव इमारतीच्या तळमजल्यावरील ईस्ट कार्ड सर्विसेस या कार्यालयाची खिडकी चोरट्याने उचकून कार्यालयात प्रवेश करून पाच लाख १३ हजारांचे वीस मोबाईल आणि सहा पाॅवरबँक असा ऐवज पळवून नेला होता. याप्रकरणी पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संशयित आरोपी आकाश जितेंद्र ठाकूर (रा. बिरवाडी, पालघर) याला ताब्यात घेण्यात आले. त्याने गुन्ह्याची कबुली देऊन चोरलेल्या वस्तू जमिनीत गाडून ठेवल्याचे सांगितले. हा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून त्याला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

