वायूप्रदूषण रोखण्यासाठी मोहीम
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः पावसाळा संपल्यामुळे आता ऑक्टोबर हीट सुरू झाली आहे. शहर आणि उपनगरात मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी २४ विभागांत पथक नियुक्त करताना पालिका प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे पालन करण्यावर भर देणार आहे.
मुंबई महानगर क्षेत्रातील वायुप्रदूषण रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वांच्या प्रभावी अंमलबजावणीचे स्पष्ट आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका, नगरपालिकांना २० जून रोजी विविध निर्देश दिले आहेत. त्याची पूर्तता करण्याची जबाबदारी समन्वय समितीवर आहे. तसेच, प्रभागवार दोन एक अभियंता, एक पोलिस, एक मार्शल, वाहन यांचे पथक नियुक्त करण्यात येणार आहे. प्रत्येक पथकाचे नेतृत्व हे विभाग कार्यालयातील एक वरिष्ठ अधिकारी करतील. विभाग स्तरावर ही पथके गठित करून तातडीने त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. लहान विभागासाठी प्रत्येकी दोन पथके, मध्यम विभागासाठी चार पथके, मोठ्या विभागासाठी सहा पथके पालिका आयुक्तांनी नियुक्त केली आहेत.
-------------------------------------------
दंडात्मक कारवाईचे आदेश
मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सुरू विकासकामे, बांधकामे यांसह हवेतील बदलांमुळे वायू गुणवत्ता स्तर खालावण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेता धूळ नियंत्रण आणण्यासाठी नियोजन करावे. वायुप्रदूषणासाठी कारणीभूत ठरत छोट्या-मोठ्या घटकांवरही अधिक लक्ष केंद्रित करावे. प्रत्यक्ष कार्यक्षेत्रस्थळी कार्यरत अधिकारी-कर्मचारी, पोलिस अंमलदारांनी वायुप्रदूषणास कारणीभूत घटकांवर कारवाई करावी, असे निर्देश दिले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

