

‘मरे’च्या ७८६ ‘लोकोमोटिव्ह’ला कवच
दोन महिन्यांत काम पूर्ण करण्याचे रेल्वे बोर्डाचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : रेल्वे गाड्या रुळावरून घसरणे, दोन रेल्वे गाड्या एकमेकांसमोर येऊन अपघात होणे, अशा विविध रेल्वे अपघातांना आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेने इंजिनला कवच यंत्रणा बसवण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम रेल्वेपाठोपाठ आता मध्य रेल्वेलासुद्धा लोकोमोटिव्ह (इंजिन)वर कवच प्रणाली लावण्याचे आदेश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार मध्य रेल्वे आपल्या ताफ्यातील ७८६ लोकोमोटिव्हला (इंजिन) कवच यंत्रणा बसविणार आहे.
संपूर्ण देशात २० हजार लोकोमोटिव्ह आहेत. त्यापैकी १५ हजार इलेक्ट्रिक, तर ५ हजार डिझेल लोकोमोटिव्ह आहेत. या सर्व लोकोमोटिव्हवर कवच यंत्रणा लावण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ताफ्यात एकूण ७८६ लोकोमोटिव्ह आहेत. त्या सर्व लोकोमोटिव्हवर कवच लावण्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. कवच यंत्रणा चार प्रकारे लागणार आहे. आरएफआयडी स्कॅनर, रुळांखालील स्लीपरवर टॅग, ड्रायव्हल डिस्प्ले यूनिट आणि अखंडित कम्युनिकेशनसाठी अँटेना लावण्यात येणार आहे. हे काम मध्य रेल्वेला दोन महिन्यांत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने नियोजन केले असून चार ते पाच वेल्डिंग टीमच्या सहाय्याने हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
अपघात टाळण्यास मदत
कवच प्रणालीमध्ये लोको पायलटला रेल्वे इंजिनला ब्रेक लावता न आल्यास कवच तंत्रज्ञान आपोआप ब्रेक लावते. एलसी गेट्सजवळ आल्यावर ड्रायव्हरच्या हस्तक्षेपाशिवाय आपोआप शिट्टी वाजू लागते. ट्रेन लाल सिग्नलजवळ आल्यावर ब्रेक आपोआप लागू होतात. कॅबमधील हे तंत्रज्ञान लाइन-साइड सिग्नल्सची पुनरावृत्ती करते. अधिक वेग आणि धुके असलेल्या हवामानात ही यंत्रणा अत्यंत उपयुक्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.