वादळी पावसाची बोईसरमध्ये हजेरी
तारापूर, ता. ९ (बातमीदार) : पालघरमध्ये उन्हाचा चटका तापदायक ठरत असतानाच बुधवारी (ता. ९) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ढगांचा गडगडाट, वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. अचानक पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांसह वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली.
‘ऑक्टोबर हीट’ वाढल्याने जिल्ह्यात उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमान सातत्याने ३२ ते ३५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. अशा स्थितीत भारतीय हवामान खात्याने आज कोकणातील काही जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. १२ दिवसांपूर्वी मोसमी पावसाने जिल्ह्यातून परतीच्या पावसाला प्रवास सुरू केला. दरम्यान, आता या पावसामुळे बोईसर, वाणगाव, तारापूरसह शेजारील परिसरातील शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली आहे. या परतीच्या पावसाने शेतीचे आणि पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज पडलेल्या पावसामुळे उभी पीके आडवी झाली आहेत. या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्याचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

