नवरात्री करीता रेल्वेची नवरात्र स्पेशल थाळी
नवरात्रीकरिता रेल्वेची स्पेशल थाळी
१५० स्थानकांवर सुविधा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ : भारतीय रेल्वेने नवरात्रीनिमित्त प्रवाशांसाठी नवरात्री स्पेशल थाळी सुरू केली आहे. देशभरातील दीडशे रेल्वे स्थानकांवर ही थाळी सुरू केली आहे. रेल्वे प्रवासी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर आणि प्रवासी मोबाईल ॲपवरून थाळी ऑर्डर करू शकणार आहेत.
भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना नेहमीच दर्जेदार सुविधा देण्यावर भर देत आहे. नवरात्री आणि दसरा सणांच्या पार्श्वभूमीवर उपवास करणाऱ्या प्रवाशांसाठी नवरात्री थाळी सुरू केली आहे. मुंबई सेंट्रल, दिल्ली जंक्शन, सुरत, जयपूर, लखनऊ, पटना जंक्शन, लुधियाना, दुर्ग, चेन्नई सेन्ट्रल, सिकंदराबाद, अमरावती, हैदराबाद, तिरूपती, जालंधर सिटी, उदयपूर, बेंगळूर कैंट, नवी दिल्ली, पुणे व मंगलोर सेन्ट्रल अशा १५०पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांवर नवरात्री स्पेशल थाळी प्रवाशांना मिळणार आहे. ही थाळी खास नवरात्रीच्या उपासाकरिता तयार करण्यात आली आहे. पोषणाची विशेष काळजी घेण्यात आली आहे. प्रवासी ही थाळी मोबाईल ॲप, आयआरसीटीसी ॲपवर पीएनआर नंबर टाकून बुक करू शकतात. याशिवाय ऑनलाइन आयआरसीटीसी ई-केटरिंग साइटवरदेखील बुक करू शकतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

