घाटकोपरमधील नारायणनगरात आग

घाटकोपरमधील नारायणनगरात आग

Published on

घाटकोपरमधील नारायणनगरात आग

घाटकोपर, ता. ९ (बातमीदार) ः येथील नारायणनगरात प्लॅस्टिकचे रॅपर बनविणाऱ्या कारखान्याला सायंकाळी साडेपाच वाजता भीषण आग लागली. या कारखान्याच्या वर सम्राट नावाची शाळा आहे. ती बंद असल्याने अनर्थ टळला.
या आगीच्या घटनेने परिसरात काही काळ घबराट पसरली. गोदामाची आग काही काळ मोठ्या प्रमाणात वाढत होती; मात्र अग्निशमन दलाचे जवान, पोलिस यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही तैनात केली होती. आजूबाजूला रहिवासी वस्ती असल्याने घटनेनंतर अग्मिशमन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. तरीही काही तास या आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले होते. आग कशामुळे लागली, याची माहिती उशिरापर्यंत हाती आली नाही. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार ही आग सिलिंडर स्फोटामुळे लागली असावी.
...
गोरेगाव येथेही आग
गोरेगाव येथे ऑइल टँकरला आग लागल्याची घटना बुधवारी (ता. ९) घडली. पूर्वेकडील प्रवासी इंडस्ट्रिअल इस्टेट परिसरात ऑइलच्या टँकरला आग लागली. यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाचा तीन गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या होत्या. अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले गेले. आग लागल्याची माहिती मिळताच चालक वेळीच बाहेर निघाला. आग कशामुळे लागली, याबाबत पोलिस तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com