घरफोडीत रोख रकमेसह सोन्याचे दागिने, साहित्याची चोरी

घरफोडीत रोख रकमेसह सोन्याचे दागिने, साहित्याची चोरी
Published on: 

घरफोडीत रोख रकमेसह सोन्याचे दागिने, साहित्याची चोरी
भिवंडी, ता. १७ (बातमीदार) : शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. यात सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम आणि साहित्याची चोरी केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी नारपोली पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील पहिल्या घटनेत १३ ते १४ ऑक्टोबरदरम्यान अज्ञात चोरट्यांनी पूर्णा येथील महानगर गॅस पेट्रोलपंपासमोरील राजश्री मार्बल ॲण्ड ग्रॅनाइटस, स्टाइलच्या दुकानाच्या पत्र्याच्या लोखंडी रोलिंगचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला.
शोरूममधील चार शॉवर सेट, चार मिक्सर फिटिंग, सेरा कंपनीचे २४ नग टायप सिपी फिटिंग, तसेच एक कॉम्प्युटर मॉनिटर असा एकूण ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला आहे. तर, दुसऱ्या घटनेत अज्ञात चोरट्यांनी १५ ऑक्टोबरला दुपारी एक ते तीन वाजेच्या सुमारास कामतघर परिसरातील नीळकंठ को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील रंगन तुळशीराम चिलवरवार यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून त्यावाटे आत प्रवेश केला. बेडरूममधील लोखंडी कपाटाचा दरवाजा उघडून लॉकरमधील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण एक लाख ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.