१७ लाखाचे लोन घेण्यास भाग पाडून केली आर्थिक फसवणूक !

१७ लाखाचे लोन घेण्यास भाग पाडून केली आर्थिक फसवणूक !
Published on: 

महिलेची आर्थिक फसवणूक
ठाणे, ता. १७ (वार्ताहर) : कापूरबावडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ३१ वर्षीय महिलेला पोलिस व्हेरिफिकेशनकरिता स्काइप ॲप डाऊनलोड करण्याच्या नावाखाली तिची १७ लाखांची आर्थिक फसवणूक केली. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
महिलेला अनोळखी मोबाईलधारक एका महिलेने कॉल करून तुम्ही तैवान देशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये एमडी व एमए ड्रग्ज सापडले आहे. नर्कोटिक्स डिपार्टमेंटमधून पोलिस बोलत असल्याचे सांगून पोलिस व्हेरिफिकेशसाठी स्काइप हे ॲप फिर्यादी यांना डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर व्हिडिओ कॉल करून कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देण्यासाठी फिर्यादीकडून १७ लाख रुपयांची रक्कम ऑनलाइन पद्धतीने आरोपीने स्वीकारून त्यांची फसवणूक केली.
चौकट
आमिषाला बळी पडू नका!
परदेशात पाठविलेल्या कुरिअरमध्ये अमली पदार्थ तसेच इतर अन्य सामान मिळून आले, तुमच्यावर पोलिस केस झाली आहे. याबाबत फोन आल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. तसेच, आपले बॅंक डिटेल व इतर खासगी माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीला शेअर करू नये. कोणत्याही प्रकारचे अनोळखी कॉल, व्हिडिओ कॉल रिसिव्ह करू नये. कोणत्याही वेबसाइट तसेच ॲप लिंक क्लिक करू नये. शेअर्स मार्केट तसेच इतर ऑनलाइन योजना यात गुंतवणूक केल्यास अधिक नफा देण्याच्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन ठाणे पोलिस आयुक्तालयाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.