ॲपच्या माध्यमातून प्रभावी निवडणूक प्रक्रिया

ॲपच्या माध्यमातून प्रभावी निवडणूक प्रक्रिया
Published on: 

मनोर, ता. १६ (बातमीदार) : विधानसभा निवडणूक प्रक्रियेदरम्यान आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन हाेणार नाही, याची आयाेगाकडून दखल घेण्यात आली आहे. तसेच उमेदवारी अर्ज आणि दिव्यांग मतदारांना आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विविध ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहेत. प्रत्यक्ष निवडणुकीच्या दृष्टीने लागणारी साधनसामुग्री आणि मतदान केंद्रावर सोयी सुविधांकरिता कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया प्रभावीपणे राबवण्यातसाठी सी-व्हिजिल ॲप, सक्षम ॲप, केवायसी ॲप, ईएसएमएस ॲप आणि १९५० हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे.

सी-व्हिजिल
आचारसंहितेच्या कालावधीत प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा तातडीने निपटारा करण्यासाठी निवडणूक आयोगाने सी-व्हिजिल मोबाईल ॲप विकसित केले आहे. यामध्ये दक्ष नागरिकाला एखाद्या ठिकाणी आचारसंहितेचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास त्या प्रसंगाचे छायाचित्र अथवा व्हीडीओ काढून तक्रार नोंदविता येणार आहे. तक्रारींवर जिल्हा प्रशासन, तसेच मुख्य निवडणूक कार्यालयाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे.

सक्षम ॲप
पात्र दिव्यांगांना मतदार नोंदणी, मतदान केंद्राचा शोध आणि व्हीलचेअरची मागणी नोंदवता येणार आहे.

केवायसी ॲप
मतदारांना त्यांच्या उमेदवाराबाबतचा तपशील, त्यांच्या नावे असलेल्या गुन्ह्यांचा तपशील पाहता येणार आहे.

ईएसएमएस ॲप/पोर्टल
निवडणूक अधिक मुक्त व निष्पक्ष वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी आचारसंहितेच्या कालावधीत अंमलबजावणी यंत्रणांकडून बेकायदा पैसा, मद्य, अमली पदार्थ व भेटवस्तू, मौल्यवान धातू जप्त केले जाणार आहे. जप्तीची माहिती निवडणूक आयोगाकडून दरदिवशी पोर्टलवरून जाहीर केली जाईल.

१९५० क्रमांकाची हेल्पलाईन
जिल्हास्तरावर संपर्क केंद्र स्थापन करण्यात आले आहेत. मतदारांना सर्व प्रकारची माहिती आणि तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा स्तरावर १९५० टोल फ्री क्रमांकाची सुविधा सुरू करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.