

आचारसंहिता कालावधीतही जाहिरातबाजी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १७ : नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा, वाढदिवसाचे अभीष्टचिंतन, पदनियुक्ती शुभेच्छा असे अनेक राजकीय बॅनर कल्याण शहरात झळकत आहेत. विशेष म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता सुरू असतानाही बहुतांश ठिकाणी हे फलक अद्यापही काढलेले नाहीत. सण-उत्सव संपल्यानंतरही फलक, बॅनर तसेच असल्याने शहर विद्रूपीकरणाचे चित्र दिसून येत आहे.
कल्याण शहरातील मुख्य रस्ते, चौक, उड्डाणपूल या फलकांमुळे विद्रूपीकरण झाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे. दुसरीकडे आचारसंहिता सुरू असतानाही फलक काढले नसल्याने निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, वंचित बहुजन आघाडी, ठाकरे गट अशा सर्वच पक्षांच्या फलकांचा यात समावेश आहे. या फलकांवर पक्षाच्या नावाचा स्पष्ट उल्लेख तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शहा, भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी खासदार कपिल पाटील यांचे छायाचित्र निदर्शनास येत आहे. शहरातील चौक, मुख्य रस्ते, रस्त्यांच्या मधील डिव्हायडरवर हे फलक, बॅनर लावलेले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.