

कल्याण, ता. १७ (वार्ताहर) : क्रेडाई एमसीएचआय, द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट, कल्याण-डोंबिवली महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इज ऑफ डूइंग बिझनेस’ सेमिनार कल्याणमध्ये नुकताच झाला. या सेमिनारमध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये भाग घेऊन सर्वासाठी घरे ही संकल्पना यशस्वी करा, असे आवाहन कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त इंदुराणी जाखड यांनी नागरिकांना केले.
कल्याण-डोंबिवली शहरातील मूलभूत सोयी-सुविधा, पाणीपुरवठा, घनकचरा, शैक्षणिक सुविधा, मल:निसारण व्यवस्था यामध्ये कमी कालावधीत सुधारणा केल्यानंतर शेवटी महापालिका आयुक्तांनी नगररचना विभागावर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील इन्फ्रास्ट्रक्चर; सौंदर्यीकरण, विकासकामे करण्यासाठी नगररचना विभागातील कामकाजामध्ये आमूलाग्र बदल केले आहे. शहर विकासाच्या दृष्टिकोनातून याचे प्रमुख घटक क्रेडाई एमसीएचआय कल्याण डोंबिवली, युनिट द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट कल्याण डोंबिवली, यांच्या माध्यमातून इज ऑफ डूइंग बिझनेस सेमिनारचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. सेमिनारप्रसंगी नामांकित विकासक महेश अग्रवाल (रिजन्सी ग्रुप), राजन बांदेकर (रोनक ग्रुप), क्रेडाई एमसीएचआय कल्याण-डोंबिवली अध्यक्ष राजेश गुप्ता, सुनील चव्हाण, तसेच आयुक्त इंदुराणी जाखड, शहर अभियंता अनिता परदेशी, एडीटीपी दिक्षा सावंत, कार्यकारी अभियंता सुरेंद्र टेंगळे, नगररचना विभागातील अधिकारी, आर्किटेक्ट असोसिएशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे सेमिनार नगररचना विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध बांधकाम परवानग्या, यामध्ये सुसूत्रता समीकरण; तसेच विलंब टाळण्याच्या अनुषंगाने स्टँडर्ड आँपरेशिंग सिस्टीम राबवण्याबाबत आयुक्तांनी मॅन्युअल प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. तसेच, याबाबतीत कार्यपद्धतीवर विपुल मार्गदर्शन करून चर्चासत्र केले. सरकारने मंजूर यूडीपीआरमधील क्लस्टर डेव्हलपमेंटबाबतची अंमलबजावणी; तसेच विस्तृत मार्गदर्शनही केले. क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये नागरिकांनी भाग घ्यावा आणि शहराचा विकास, सर्वांसाठी घरे ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन व सादरीकरण करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.