बेकायदा फलकांवर कारवाईचा सपाटा

बेकायदा फलकांवर कारवाईचा सपाटा
Published on: 

मुंबई ः विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर गेल्या दोन दिवसांत मुंबई महापालिकेने तब्बल सात हजार ३८९ भित्तीपत्रके, फलक, बॅनर्स, झेंडे आदी अनधिकृत साहित्य हटवले आहेत. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मुंबईत विधानसभा निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने अनधिकृतपणे जाहिरात फलक, बॅनर्स, पोस्टर्सवर तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी आणि पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत. गेल्या दोन दिवसांत भित्तीपत्रके (९४२), फलक (८१७), कटआऊट होर्डिंग (५९६), बॅनर्स (३७०३), झेंडे (१३३१) आदी मिळून सात हजार ३८९ साहित्यावर कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.