फसवणूक प्रकरणी रेमो डिसोझावर गुन्हा, काय आहे नेमके प्रकरण?

remo d'souza
remo d'souzaesakal
Published on: 

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : मिरा-भाईंदरमधील नृत्य समूहाची फसवणूक केल्याप्रकरणी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसोझा यांच्यासह आठ जणांवर मिरा रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.
मिरा-भाईंदरमध्ये राहणाऱ्या मुलांनी व्ही. अनबिटेबल डान्स ग्रुप स्थापन केला होता. या समूहाच्या माध्यमातून त्यांनी देश-परदेशात अनेक शो केले. त्यातून त्यांना कोट्यवधी रुपयांची कमाई केली. ही रक्कम या ग्रुपने व्यवस्थापक म्हणून नेमलेल्या व्यक्तीने हडप केली. त्याचप्रमाणे कोरिओग्राफर रेमो डिसोझा यांनी या मुलांच्या जीवनावर चित्रपट करायचे आश्वासन दिले होते; मात्र ते पूर्ण केले नाही.

remo d'souza
Remo D'Souza :रश्मिकासोबत डान्सच्या बादशहाचा ठुमका

याप्रकरणी वीर नरोत्तम याने दिलेल्या तक्रारीवरून ओमप्रकाश चौहान, रेमो डिसोझा, त्यांची पत्नी यांच्यासह आठ जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.