Sukha Kahlo: सलमानच्या पनवेल फार्म हाऊसवर सुद्धा पोहचली होती बिष्णोई गँग.. कसा सापडला शार्प शूटर सुखा कालुया?

Lawrance Bishnoi: शार्पशूटर सुखा कालुया हरियानातून अटकेत, सलमान खानच्या हत्येचा कट
Sukha Kahlo: सलमानच्या पनवेल फार्म हाऊसवर सुद्धा पोहचली होती बिष्णोई गँग.. कसा सापडला शार्प शूटर सुखा कालुया?
Published on: 

नवी मुंबई, ता. १७ (वार्ताहर) : सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान याच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार गँग टोळीतील शार्पशूटर सुखा कालुया याला हरियाना आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्त कारवाई करून पानिपत येथून बुधवारी (ता. १६) अटक केली. सुखा कालुया याच्यावर अभिनेता सलमान खानवर हल्ल्याचा कट रचल्याचा आरोप आहे.
नवी मुंबई पोलिस त्याला खास विमानाने घेऊन नवी मुंबईत येणार आहेत. त्यानंतर त्याची या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे. यापूर्वी पनवेल शहर पोलिसांनी या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर पाच आरोपींना अटक केली आहे.

लॉरेन्स बिष्णोई व गोल्डी ब्रार गँगमधील आरोपींनी पाकिस्तानातून अत्याधुनिक शस्त्रास्त्रे मागवून सलमान खानची हत्या करण्याचा कट रचल्याची माहिती मिळाल्यानंतर पनवेल शहर पोलिसांनी जून महिन्यामध्ये धनंजयसिंह तपेसिंग ऊर्फ अजय कश्यप (वय २८), गौरव विनोद भाटिया ऊर्फ न्हायी संदीप (वय २९), वस्पी मेहमूद खान ऊर्फ वसीम चिकना (वय ३६), झिशान झकरुल हसन ऊर्फ जावदे खान (वय २५) व दीपक हवासिंग गोगालिया ऊर्फ जानी वाल्मीकी (वय ३०) या पाच आरोपींना अटक केली होती.

त्यानंतर शार्पशूटर सुखा कालुया हा पानिपत येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर हरियाना पोलिसांनी नवी मुंबई पोलिसांसह पानिपत येथे संयुक्त कारवाई करून त्याला अटक केली. या टोळीतील आरोपींनी सलमान खान याच्यावर हल्ला करण्यासाठी पनवेलमधील त्याचे फार्म हाऊस, बांद्रा येथील घर तसेच फिल्मसिटी येथे रेकी केली होती. तसेच, काही आरोपींनी पनवेल बस स्टॅंड, रेल्वे स्टेशन येथे बैठकादेखील घेतल्या होत्या. पोलिसांनी आता या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर आरोपींचाही शोध सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.