ठाण्यात आराेपीवर कडक कारवाईसाठी मनसेचा माेर्चा

ठाण्यात आराेपीवर कडक कारवाईसाठी मनसेचा माेर्चा
Published on: 

पीडितेला न्याय द्या!
ठाण्यात मनसेचा मोर्चा ः राज ठाकरेंचीही पीडित कुटुंबीय घेणार भेट
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाण्यातील भंडारआळीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई करून पीडिता व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गुरुवार (ता. १७) मोर्चा काढला. आरोपीविरुद्ध मंगळवारपर्यंत योग्य ती कारवाई न झाल्यास ठाणे बंदची हाक दिली जाईल, असा इशाराही मनसेने दिला.
मागील आठवड्यात भंडारआळीतील अल्पवयीन मुलीचा सचिन यादव याने विनयभंग केला हाेता. या घटनेनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर ठाणेनगर पाेलिसांनी त्याला अटकही केली; परंतु दुसऱ्याच दिवशी ताे जामिनावर सुटल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. त्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. या वेळी सचिन यादव याचा जामीन रद्द झालाच पाहिजे, आराेपीला कडक शिक्षा झालीच पाहिजे, अशा घाेषणा देण्यात आल्या. तसेच, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून पुन्हा अटक करावी, त्याचा जामीन रद्द करावा, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी केली. या माेर्चामध्ये मनसेचे ठाणे, पालघर अध्यक्ष अविनाश जाधव, ठाणे शहर अध्यक्ष रवी माेरे, महिला शहर अध्यक्षा समीक्षा मार्कंडे, उपाध्यक्षा मंजुळा डाकी यांच्यासह मनसे कार्यकर्ते सहभागी झाले हाेते.
............
चौकट
कैफियत मांडणार
ठाण्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे शुक्रवारी येणार आहेत. त्यावेळी पीडित कुटुंबीय राज ठाकरे यांची भेट घेऊन कैफियत मांडणार असल्याची माहिती मनसेचे रवी माेरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.