गोवंडी ‘शताब्दी’चे नूतनीकरण रखडले

गोवंडी ‘शताब्दी’चे नूतनीकरण रखडले
Published on

गोवंडी ‘शताब्दी’चे नूतनीकरण रखडले
मुंबई, ता. २२ ः चेंबूर, मानखुर्द, गोवंडी, शिवाजी नगर या परिसरातील नागरिकांना सोयीचे असलेले शताब्दी रुग्णालयाचे भूमिपूजन होऊन पाच वर्षे उलटूनही या रुग्णालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू झालेले नाही. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या रुग्णायलयाचे नूतनीकरण तातडीने सुरू करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पूर्व उपनगरातील गोवंडीतील पालिकेचे शताब्दी रुग्णालय हे येथील गोरगरीब रुग्णांसाठी एकमेव रुग्णालय आहे. या रुग्णालयात रोज मोठ्या प्रमाणात रुग्णांची गर्दी असते. या रुग्णालयात सुविधा न मिळाल्‍यास रुग्णांना घाटकोपरच्या राजावाडी किंवा सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात यावे लागते. पालिकेच्या माध्यमातून या रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये तब्बल ५८० खाटांची व्यवस्था रुग्णालयात होणार होती. रुग्णालयाच्या कामाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. तीन वेळा कंत्राटदाराला मुदत वाढवून देण्यात आली, मात्र याला पाच वर्षांचा कालावधी लोटला तरी अद्याप प्रत्‍यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही.

तातडीने
उपाययोजना करा!
नूतनीकरण रखडल्याने चेंबूर, शिवाजी नगर, मानखुर्द या भागातील रुग्णांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे रुग्णालयाचे काम तातडीने सुरू करावे, अशी मागणी केली जाते आहे. दरम्यान, विभागात गेल्या तीन वर्षांपासून पायाभूत सुविधांची वानवा असल्यामुळे तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com