

ठाणे शहर, ता.२२ (बातमीदार)ः अंबरनाथ एमआयडीसीत वन्य प्राण्यांची हत्या करण्यास प्रतिबंध असताना महिनाभरापूर्वी दुर्मिळ पिसोरा जातीच्या हरणाचा शिकारीचा प्रयत्न झाला होता. उपचारादरम्यान हरणाचा मृत्यू झाल्याने वन विभागाने एकाला अटक केली. तर अन्य दोघांचा शोध सुरू आहे.
अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसी परिसरात एका पिसोरा जातीचे हरण जखमी अवस्थेत आढळून आले होते. बदलापूर वनविभागाने या हरणाला बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन विभागाच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या तपासणीत बंदुकीची गोळी लागल्याचे निष्पन्न झाले. तसेच प्रतिबंध असताना शिकारीचा प्रयत्न झाल्याने वनविभागाच्या पथकाने जगदीश वाघला (२५) शनिवारी (ता.१९) ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.
------------------------------------------
‘माउस डियर’ नावाने ओळख
पिसोरा हरण आग्नेय आशिया, दक्षिण आशियापासून मध्य व पश्चिम आफ्रिकेपर्यंत जंगलात सापडते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात देखील या हरणांचे वास्तव्य आहे. हरणांच्या जातींमध्ये सर्वात लहान असल्याने डोके लहान, नाकपुड्या उंदरासारख्या टोकदार असतात. त्यामुळे ‘माउस डियर’ म्हणतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.