

ठाणे, ता.२२ (वार्ताहर)ः शहरातील ‘हीट अॅण्ड रन’ प्रकरणातील कार चालकाची ओळख पटवण्यात ठाणे पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी अभिजित नायरला ताब्यात घेण्यात आले असून वैद्यकीय तपासणीनंतर त्याला नौपाडा पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार आहे.
ठाण्याच्या नितीन कंपनी जंक्शनवर भरधाव कारने वेगाने सोमवारी पहाटे दीडच्या सुमारास दर्शन हेगडेला (२१) धडक दिली होती. घटनेनंतर कारचालक फरारी झाला होता. तर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दर्शनचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी नौपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सीसी टीव्हीच्या माध्यमातून कारचा क्रमांक शोधण्यात आला. त्याआधारे गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी मुलुंड परिसरातून अभिजित नायरला ताब्यात घेतले. तसेच मुलुंडच्या पालिका वाहनतळातून अपघातग्रस्त कार जप्त करण्यात आली. नौपाडा पोलिसांनी वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरु केली. तसेच अभिजितचे वडिलांसह कुटुंबीयांची ही चौकशी केली आहे.
-----------------------------------
कार चालवण्याच्या हौस महागात
कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असलेल्या अभिजितला मर्सिडीज कारचे आकर्षण होते. त्यातूनच त्याने अवघ्या ३ लाख ८० हजारांत महागडी कार खरेदी केली. खासगी कंपनीत कामाला असलेला अभिजित सोमवारी पहाटे नाशिक-मुंबई महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाताना हा अपघात झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.