ठाण्यात दिवाळी पहाटचा उत्साह
ठाण्यात ‘दिवाळी पहाट’चा उत्साह
जय जय महाराष्ट्र माझा, जय श्रीरामच्या गाण्यांवर तरुणाईने धरला ठेका
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. ३१ : जय जय महाराष्ट्र माझा, जय जय श्रीरामच्या गाण्यावर ठेका धरत, दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटेपासूनच तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. ठाण्यातील राम मारूती रोड, मासुंदा तलाव परिसर, गडकरी चौक तरुणाईने फुलून गेला होती. यावेळी पारंपरिक वेशभूषा करून तरुणाई या ठिकाणी एकत्र जमत एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तर, विविध सामाजिक संघटनांकडून आयोजित केलेल्या कार्यक्रमात विविध गाण्यांवर तरुणाई थिरकताना दिसून आली. तसेच, अनेक गायक, ब्रास बँड पथकांच्या गाण्यांनी आजची दिवाळी पहाट कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवली.
दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे नरक चतुर्दशी. या दिवशी विविध सामाजिक संघटनांकडून दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार यंदाही ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात आयोजन केले होते. या ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासून हे कार्यक्रम सुरू झाले. जसजसा दिवस उजाडत होता, तसतसा तरुणांच्या जल्लोषात भर पडत होती. तरुण-तरुणींचे घोळके मासुंदा तलाव, गडकरी चौक, राम मारूती रोड परिसरात दाखल होण्यास सुरुवात झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटसाठी कपड्यांमध्ये वैविध्य दिसून आले. यंदा महिलांमध्ये घरारा ड्रेस, भरजरी ओढण्यांचा ड्रेस, तसेच दक्षिण भारतीय पद्धतीच्या घागरा साडीच्या प्रकाराला महिलांची सर्वाधिक पसंती होती.
यंदाच्या दिवाळी पहाटला पुरुष विविध नक्षीदार कुर्त्यांमध्ये दिसून आले. अनेकजण मित्र-मैत्रिणींसोबत सेल्फी काढण्यात रमून गेले होते. डिजेच्या तालावर ठेका धरत सर्वांनी दिवाळी पहाट जल्लोषात साजरी केली. चिंतामणी चौकात राॅकस्टार क्वीन पल्लवी दाभोळकर, गायक स्वप्नील गोडबोले, तसेच राम मारूती रोड परिसरात बाळकुम येथील राष्ट्रीय ब्रास बॅंडच्या पथकांचे वादन आयोजित केले होते.
रतन टाटांना श्रद्धांजली
उद्योग जगतात आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणारे टाटा उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी अनेक ठिकाणी फलक लावले होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.