मुरबाडमध्ये खोट्या प्रचारातून मतदारांची दिशाभूल

मुरबाडमध्ये खोट्या प्रचारातून मतदारांची दिशाभूल
Published on

मुरबाडमध्ये खोट्या प्रचारातून मतदारांची दिशाभूल
निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
बदलापूर, ता. १७ (बातमीदार) : विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचा प्रचार सुरू असताना, खोटा प्रचार करून मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनी केला आहे. एका विविध उपक्रमांसाठी आपल्या व्यवसायातून तीन लाख रुपयांची अनामत रक्कम देणाऱ्या सुभाष पवार यांच्यावरच या संस्थेचे पैसे उकळल्याचा आरोप केल्याचे म्हणणे आहे. या खोट्या प्रचारातून रडीचा डाव खेळला जात असून याप्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी व मुरबाड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच, संबंधित आरोपींविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे.

मुरबाड तालुक्यात जनसेवा शिक्षण संस्थेकडून विविध शाळा व महाविद्यालये चालविली जातात. या संस्थेच्या उपक्रमांसाठी व शाळेतील विविध पायाभूत सुविधांसाठी अनामत रक्कम जमा केली जाते. महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांनीही संस्थेला तीन लाख रुपयांची अनामत रक्कम दिली. या व्यवहाराची त्यांच्या व्यवसायाच्या इन्कम टॅक्ससाठी भरलेल्या कागदपत्रांमध्ये नोंद करण्यात आली. निवडणुकीसाठी दाखल केलेल्या अ‍ॅफिडेव्हिटमध्ये या व्यवहाराची नोंद झाली असून जनसेवा शिक्षण संस्थेबरोबरच इतरही व्यक्तींना अनामत रक्कम दिल्याची नोंद आहे; मात्र जनसेवा शिक्षण संस्थेला दिलेल्या अनामत रकमेऐवजी संस्थेकडून सुभाष पवार यांनी पैसे घेतल्याचा खोटा प्रचार मुरबाडमध्ये सुरू झाल्याचा प्रकार घडला आहे.

नोंदीचा सोयीस्कर अर्थ
अ‍ॅफिडेव्हिटमधील नोंदीचा सोयीस्कर अर्थ लावून व खोटा आरोप करून सुभाष पवार यांनी संस्थेकडून पैसे घेतल्याचा आरोप केल्याचे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे. कायदेशीररीत्या कागदपत्रांची छाननी व माहिती न घेताच सुभाष पवार यांना निवडणुकीत बदनाम करण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. याप्रकरणी सुभाष पवार यांनी मुरबाड मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व मुरबाड पोलिस ठाण्याकडे तक्रार केली आहे. व्हॉट्सअ‍ॅप व प्रसिद्धीमाध्यमात बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com