टीएमटीमधील सुरक्षा वाऱ्यावर

टीएमटीमधील सुरक्षा वाऱ्यावर

Published on

ठाणे, ता. १७ (वार्ताहर) : ठाणे महापालिकेच्या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. मात्र, काही बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याने त्याचा फायदा चोरटे घेत असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या एका विद्यार्थिनीची सोनसाखळी लांबवल्याचा प्रकार मंगळवारी (ता. १२) घडला होता. विशेष म्हणजे चौकशीत त्या बसमधील सीसीटीव्ही बंद असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापलिका परिसराची लोकसंख्या २५ लाखांहून अधिक आहे. एक लाख लोकसंख्येला किमान ३० बस हे प्रमाण लावले, तरी ठाणेकरांच्या सुविधांसाठी जवळपास ७५० चांगल्या बसचा ताफा आवश्यक आहे. मात्र, ठाणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी रस्त्यावर निम्म्या बसच धावत असल्या‍ची वस्तुस्थिती आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजनेतून बसची मदत घेण्यात आली. मात्र, ज्या बस आल्या, त्या सततत नादुरुस्त असायच्या किंवा ड्रायव्हर, कंडक्टरअभावी रस्त्यावर धावू शकत नव्हत्या. त्वापरात नसल्याने त्यांची योग्य देखभाल दुरुस्ती करता येत नव्हती. अशा प्रकारे आजही शेकडो बस दुरुस्तीअभावी बंद असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी बसमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. त्याची देखभाल आणि दुरुस्ती मात्र योग्य पद्धतीने करण्यात येत नसल्याने बऱ्याच बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे उघड झाले आहे.

विद्यार्थिनीच्या सोनसाखळीवर डल्ला
ठाण्याच्या रामचंद्रनगर क्रमांक १ मध्ये राहणारी युवती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते. नेहमीप्रमाणे १२ नोव्हेंबरला तिने गावदेवीकडे जाण्यासाठी नितीन सिग्नलवरून ठाणे पालिका परिवहन सेवेची बस पकडली. या दरम्यान बसमध्ये चोरट्यांची टोळीही होती. त्यांनी बसमधील मौल्यवान वस्तू चोरून पुढच्या बस थांब्यावर उतरले. यावेळी एका प्रवाशाने अरे चोरटे निघून गेले. आपल्या वस्तू आहेत का बघा, असे सांगताच त्या विद्यार्थिनीला आपल्या गळ्यातील सोनसाखळी नसल्याचे लक्षात आले. शोध घेऊनही सोनसाखळी सापडली नाही. विशेष म्हणजे, बसमधील सीसीटीव्ही कॅमेरेही बंद असल्याचे उघड झाले. त्यामुळे ६ ग्रॅमची ३० हजार रुपये किमतीची सोनसाखळी चोरी झाल्याची तक्रार नौपाडा पोलिस ठाण्यात करण्यात आली.

परिवहन सेवेच्या नव्या ई-बसमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात आले आहेत. त्याची देखभाल, दुरुस्ती संबंधित ठेकेदार कंपनीवर सोपवण्यात आली आहे. जर बसमधील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असतील, तर त्या कंपनीवर कार्यवाही करण्यात येईल.
- भालचंद्र बेहरे, ठाणे परिवहन व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com