बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तयारी

बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तयारी

Published on

बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची तयारी
मुरबाड, ता. १७ (बातमीदार) : मुरबाड विधानसभा मतदारसंघातील मयत, स्थलांतरित व दुबार नावे असलेल्या मतदारांच्या नावाने होणारे बोगस मतदान टाळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. प्रत्येक मतदान केंद्रावर अशा संशयित बोगस मतदारांच्या याद्या देण्यात येणार आहेत. त्यामुळे यावेळी मुरबाड मतदारसंघातील बोगस मतदान टळण्याची शक्यता आहे.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शरद पाटील यांनी मुरबाड मतदारसंघातील मतदान यादीत मयत, स्थलांतरित व दुबार नावे असल्याची तक्रार केली होती. या व्यक्तींच्या नावाने बोगस मतदान होण्याची शक्यता त्यांनी तक्रारीत व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने मुरबाड मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी अंजली पवार यांनी शरद पाटील यांना पत्र पाठवले आहे. त्यामध्ये निवडणूक आयोगातर्फे प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी तयार केलेली अनुपस्थित, स्थलांतरित व मृत मतदारांची यादी देण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ज्या मतदाराचे नाव या यादीमध्ये आहे, अशा मतदाराच्या ओळखपत्राची खात्री करून घोषणापत्र फॉर्म भरून घेऊन त्यावर स्वाक्षरी व अंगठ्याचा ठसा घेण्यात येणार आहे. मुरबाड मतदारसंघात शहापूर व अंबरनाथ तालुक्यातील सुमारे ३० हजार नावांचा समावेश आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com