मेंढपाळांचे माणगाव तालुक्यात आगमन

मेंढपाळांचे माणगाव तालुक्यात आगमन

Published on

मेंढपाळांचे माणगाव तालुक्यात आगमन
घाटमाथ्यावरून चारा-पाणीच्‍या शोधात भटकंती
माणगाव, ता. १७ (बातमीदार) ः उदरनिर्वाहासाठी घाटमाथ्यावरून मेंढपाळ माणगाव तालुक्यात येण्यास सुरुवात झाली आहे. कोकणात पावसाळ्यानंतर मोठ्या प्रमाणावर चारा मिळतो. त्‍यामुळे सातारा, पुणे पट्ट्यातील मेंढपाळ आपला मुक्‍काम पुढील काही महिने कोकणात करतात.
कोकणातील पाऊस संपल्यानंतर काही दिवसांनी आपापल्या शेळ्या-मेंढ्या घेऊन घाटमाथ्यावरील मेंढपाळ आपला प्रवास सुरू करतात. प्रतिवर्षी दिवाळी झाल्यानंतर घाटमाथ्यावरून अनेक मेंढपाळ कोकणात येत असतात. पारंपरिक ठरलेल्या गावातून प्रवास करत हे मेंढपाळ ठरावीक गावात मुक्काम करतात. गावाच्या शिवारातील जंगलात मेंढ्या चरतात. पुढील काही महिने ते कोकणातच वास्तव्य करतात. रात्री शेतकऱ्यांच्या शेतात मेंढ्या बसवून त्याबदल्यात भात किंवा पैसे रोखीने घेतात. शिवाय जमीन सुपीक ठेवण्यासाठी शेतकरीवर्गाकडून या मेंढपाळांना मोठी मागणी असते. या दिवसात कोकणात सण-उत्सव मोठ्या प्रमाणात असतात. या उत्सवात लग्न समारंभात मटणासाठी शेळ्या- मेंढ्या पुरविण्याचे काम हे मेंढपाळ करतात. सहा महिने आपल्या बिऱ्हाडासह उघड्यावर संसार मांडतात.
........................
गावांबरोबर सलोख्याचे संबंध
२०० ते ३०० शेळ्या-मेंढ्या, कोंबडी, घोडे असे सगळे बिऱ्हाड सोबत असते. मृग नक्षत्र सुरू होण्यापूर्वी मेंढपाळ परतीच्या प्रवासाला सुरुवात करतात. पुन्हा आलेल्याच मार्गाने प्रवास करून घाटमाथ्यावर पाऊस सुरू होण्यापूर्वी आपापल्या गावी पोहोचतात. प्रतिवर्षी घाट ते कोकण असा प्रवास करणारे मेंढपाळ परंपरागत या व्यवसायात आहेत. कोकणातील गावांशी सलोख्याचे संबंध ठेवून राहणारे हे मेंढपाळ सहा ते सात महिने भटके जीवन जगतात. पाऊस गेल्याने पुन्हा हे मेंढपाळ दहा ते पंधरा दिवस प्रवास करून तालुक्यात दाखल होत आहेत. कोरोना महामारी व लांबलेला पाऊस यामुळे यावर्षी थोडा उशीर झाला असला तरी परंपरेनुसार घाटमाथ्यावरील मेंढपाळ तालुक्यात दाखल झाले आहेत.
..................

फोटो – घाटमाथ्यावरून मेंढपाळ पुन्हा तालुक्यात येण्यास सुरुवात झालेली दिसत आहे. ( छाया - परेश शिंदे, माणगाव )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com