मिरा-भाईंदरमध्ये प्रचाराचा धडाका

मिरा-भाईंदरमध्ये प्रचाराचा धडाका

Published on

भाईंदर, ता. १७ (बातमीदार) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा रविवार असल्याने उमेदवारांनी मिरा-भाईंदर मतदारसंघात प्रचाराचा धडाका उडवून दिला. या वेळी जाहीर सभा, रोड शो, बाईक रॅली आदींद्वारे पुन्हा एकदा शक्तिप्रदर्शन करत जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधला.

निवडणुकीचा प्रचार सोमवारी (ता. १८) सायंकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यापूर्वीचा शेवटचा रविवार होता. मतदार आज (ता. १७) घरातच असल्याने ती संधी साधून उमेदवारांनी जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. भाजपचे उमेदवार नरेंद्र मेहता यांच्यासाठी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांनी भाईंदर पूर्व येथील आरएनपी पार्क येथे सकाळी जाहीर सभा घेतली, त्याचप्रमाणे मतदारांशी थेट संपर्कही साधला. त्याचप्रमाणे भाजपचे केरळमधील नेते, केंद्रीय मंत्री सुरेश गोपी यांनीही मिरा रोडमधील मल्याळी समाजातील मतदारांशी संपर्क साधला.

काँग्रेसचे उमेदवार मुझफ्फर हुसेन यांनी रविवारचे औचित्य साधून संपूर्ण मतदारसंघात रोड शो आयोजित केला. उत्तन नाका येथून सकाळी या शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली. मोर्वा, राई, मुर्धा आदी गावांसह भाईंदर व मिरा रोडमधील मतदारांशी त्यांनी संपर्क साधला. या वेळी त्यांच्यासोबत राजस्थानचे माजी आरोग्यमंत्री राजकुमार शर्मा, केरळचे आमदार सजीव जोसेफ, पद्मराज पुजारी आदी उपस्थित होते.

आमदार गीता जैन यांनीदेखील सकाळी मतदारांशी संपर्क मोहीम राबवली. त्याचप्रमाणे मिरा रोड येथील एस. के. स्टोन मैदान या ठिकाणी सायंकाळी त्यांनी जननिर्धार महासभेचे आयोजन केले होते. गीता जैन या अपक्ष असल्याने त्यांच्यासाठी स्थानिक पातळीवरील नेते व कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते. मनसेचे उमेदवार संदीप राणे यांनी बाईक रॅलीचे आयोजन केले होते. भाईंदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट चौकातून सकाळी त्यांची बाईक रॅली सुरू झाली. भाईंदर, मिरा रोडमधील मतदारांशी त्यांनी या वेळी संपर्क साधला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com