खवसावाडी येथील रस्ताचे काम अखेर पुर्ण

खवसावाडी येथील रस्ताचे काम अखेर पुर्ण
Published on

खवसावाडी येथील रस्ताचे काम अखेर पुर्ण
पेण, ता. १७ (वार्ताहर) : पेण तालुक्यातील खवसावाडी येथील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्‍यामुळे ग्रामस्‍थांना दिलासा मिळाला आहे.
खवसावाडी ते तांबडी या रस्‍त्‍याचे दोन वर्षांपूर्वी पूर्ण झाले होते, मात्र पावसामुळे रस्‍त्‍याची दयनीय अवस्‍था झाली होती. पावसाच्‍या पाण्यामुळे रस्त्याची माती वाहून गेली होती. त्‍यामुळे ये-जा करण्यासाठी फक्त पायवाट राहिली होती. त्‍यामुळे ग्रामस्‍थांकडून तक्रार करण्यात आली होती. त्‍यानुसार बांधकाम विभागाकडून संबंधित ठेकेदार कंपनीकडून ६० लाख रुपयांचा निधी खर्च करून जेसीबीच्या सहाय्याने दोन्ही साईट कटींग करून रस्‍त्‍यावरील खड्डे बुजविण्यात आले. अनेक ठिकाणी भराव टाकून ओढ्या-नाल्यांना पाइप बसवून रस्त्याचे पिंचिंग करण्यात आले. सदर काम हर्षा कन्स्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आले आहे. दरम्यान, रस्ता डांबरीकरणासाठी जास्तीच्या निधीची मागणी केली होती, परंतु सदरील निधी मंजूर न झाल्याने डांबरीकरण होऊ शकले नाही, असे हर्षा कंपनीकडून सांगण्यात आले. त्‍यामुळे कंपनीची नाहक बदनामी करण्यात येत असल्याचे कंपनीच्‍या अभियंत्याकडून सांगण्यात आले.
......................
सदर रस्ता हा दोन वर्षांपूर्वी झालेला आहे. जो इस्टिमेट होता त्याप्रमाणे काम पूर्ण करण्यात आले आहे.
प्रकाश गावित, उपअभियंता, बांधकाम विभाग जिल्हा परिषद, पेण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com