७२ टक्के मतदारांच्या हाती व्होटर स्लिप

७२ टक्के मतदारांच्या हाती व्होटर स्लिप

Published on

७२ टक्के मतदारांच्या हाती व्होटर स्लिप
जिल्हा कार्यालयातून वाटप मोहीम वेगात
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तयारी झाली आहे. गटस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना मतदार माहिती चिठ्ठ्यांचे (व्होटर स्लिप) वाटप करण्यात येत आहे. आजपर्यंत जिल्ह्यात ५२ लाख ६७ हजार ५६० इतक्या म्हणजे ७२.८६ टक्के व्होटर स्लिपचे वाटप झाल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे. उर्वरित १९ लाख ६१ हजार ७७९ व्होटर स्लिपचे वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

ठाणे जिल्ह्यात मतदान वाढावे, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून विविध उपक्रमाद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. तसेच, मतदारांना त्यांचे नाव मतदार यादीत असलेल्या अनुक्रमांक, मतदान केंद्र क्रमांक व मतदान खोली क्रमांक कळावे, यासाठी मतदार माहिती चिठ्ठीचे अर्थात व्होटर स्लिपचे वाटप बीएलओंमार्फत प्रत्येक मतदारसंघात करण्यात येत आहे. जिल्ह्यात ७२ लाख २९ हजार ३३९ इतके आहे. त्यातील १८ विधानसभा मतदारसंघात आतापर्यंत ५२ लख ६७ हजार ५६० इतक्या व्होटर स्लिपचे वाटप केले आहे.

मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात एकूण ५,१०,८६२ मतदार आहेत. त्यापैकी आजपर्यंत ३,१५,२३१ मतदारांचे व्होटर स्लिप बीएलओंमार्फत वाटप केले आहेत. उर्वरित १,९५,६३१ व्होटर स्लिप वाटण्याचे काम प्रगतिपथावर आहे. आतापर्यंत या मतदारसंघात ६१.७१ टक्के मतदार माहिती चिठ्ठ्यांचे वाटप पूर्ण केले आहे.

अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात एकूण ३,७४,६६४ मतदार संख्या आहे. यापैकी आतापर्यंत ३,१८,८९५ एवढ्या व्होटर स्लिपचे वाटप केले आहे. एकूण ८५.१७ टक्के व्होटर स्लिपचे वाटप झाल्याची माहिती अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांनी कळविले आहे.

व्होटर स्लिप वाटपाची आकडेवारी
मतदारसंघ मतदार संख्या स्लीपची संख्या
मतदारसंघ मतदार चिठ्ठी वाटप टक्के
भिवंडी ग्रामीण ३,३७,७११ ३,३०,४२१ ९७.८४
शहापूर (अ.ज.) २,९१,०५७ २,७०,६८२ ९३.००
भिवंडी पश्चिम ३,३४,०३७ २,२३,००३ ६६.७
भिवंडी पूर्व ३,७३,६४५ ३,१७,६१८ ८५.०१
कल्याण पश्चिम ४,४०,५९७ १,९८,२६९ ४५.००
मुरबाड ४,७०,०४० ३,७४,९७८ ७९.७८
अंबरनाथ ३,७४,६६४ ३,१८,९५१ ८५.१३
उल्हासनगर २,८३,३७९ २,२९,५५९ ८१.०१
कल्याण पूर्व ३,२९,१७३ १,४४,२३२ ४३.८२
डोंबिवली ३,१३,१२२ १,६८,७४६ ५३.८९
कल्याण ग्रामीण ५,१०,२४७ ३,६२,९३९ ७१.१३
मिरा-भाईंदर ५,१०,८६२ ३,१५,२३१ ६१.७१
ओवळा माजिवडा ५,४५,११० ३,९८,३०९ ७३.०७
कोपरी पाचपाखाडी ३,३९,५२६ २,३४,५८९ ६९.०९
ठाणे ३,७८,२०७ ३,०२,०५३ ७९.८६
कळवा-मुंब्रा ४,८५,३२४ ३,०१,२८७ ६२.०८
ऐरोली ४,८९,०५९ ४,५६,५३९ ९३.३५
बेलापूर ४,२३,५७९ ३,२०,१५४ ७५.५८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com